सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोरला झालेल्या भाजपाच्या दिवाळी कीट वाटप कार्यक्रमात भोलावडे येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींचा जाहीर निषेध करून जोडे मारो आंदोलन सोमवार दि. ७ रोजी सकाळी १० होणार आहे.
यावेळी पुणे-सातारा महामार्ग कापूरव्होळ चौक, भोर येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे अशी माहिती काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष शैलेशदादा सोनवणे यांनी दिली. यावेळी अध्यक्ष राजगड (वेल्हा ) तालुका काँग्रेस नानासो राउत,अध्यक्ष मुळशी तालुका काँग्रेस गंगाराम मातेरे तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
COMMENTS