सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
गेल्या ७० दिवसांपासून बिग बॉसच्या घरात रंगलेला खेळ संपला असून सगळ्यांना बुक्कीत टेंगूळ देऊन बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला. गायक असलेला अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ज्याला गेम कळत नाही अशी टीका होत असलेल्या सूरज चव्हाणने त्याची पॉवर दाखवली आणि बिग बॉस जिंकत बक्कळ कमाई केली. सूरज चव्हाणवर आता बक्षीसांचा वर्षाव झाला असून एका क्षणात तो लखपती झाला. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.
बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. जर मी विजेता झालो तर त्या पैशातून गावाला घर बांधणार आणि त्या घराला बिग बॉस चे नाव देणार असे सुरज चव्हाण याने यापूर्वीच जाहीर केले आहे.