सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
ग्रामीण भागात अजूनही पायाभूत सुविधांची वाणवा आहे.त्यामुळे गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी, समस्या, प्रश्न विचारून त्यांन जीवनावश्यक सुविधा मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून कार्यरत रहा असे आवाहन पुरंदर हवेली भाजपा निवडणूक प्रमुख, युवा नेते बाबाराजे जाधवराव यांनी केले.
झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील ५० लक्ष रुपयाचे ग्रामपंचायत मार्फत विविध विकास कामांचे भूमिपूजन बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जगताप, सरपंच शरद झेंडे, उपसरपंच सोनाली झेंडे ,सदस्य पूनम झेंडे, वंदना खटाटे ,शिवाजी खटाटे ,कौशल्या झेंडे ,अमर झेंडे ,ग्रामसेविका रश्मी सांगळे, अजित गोळे, पोलीस पाटील सारिका झेंडे, बाळासो झेंडे ,शिवानंद खटाटे ,दिनेश झेंडे, रूपाली झेंडे ,सोनाली पवार ,पंडित झेंडे ,समीर झेंडे, विठ्ठल झेंडे,ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती ,महिला मंडळ, कर्मचारी वर्ग ,शेतकरी ,ग्रामस्थ आदी उपस्थित होते .
बाबाराजे जाधवराव पुढे म्हणाले,गावाची असणारी एकजूट ,ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ,ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थांच्या पुढाकारातून एकसंधपणे एवढी विकास कामे मंजूर करून आणताना खूप आनंद झाला एकजुटीमुळे आपण ही विकास कामे करू शकलो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित गोळे यांनी केले . सूत्रसंचालन शिवाजी खटाटे यांनी केले.आभार सरपंच शरद झेंडे यांनी मानले .
COMMENTS