सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा येथील लक्ष्मी अभिजीत ज्वेलर्स या सोन्याच्या पेढीवर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास दुकानाचे कुलपे गॅस कटरच्या साह्याने तोडून शटर उचकटून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
अभिजीत ज्वेलर्सचे मालक नेहमीप्रमाणे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले सकाळी दुकान उघडण्यास आले असता सेंटरची तिन्ही कुलपे तोडलेल्या अवस्थेत दिसली व अर्धा दरवाजा उघडा दिसला आत मध्ये पाहिले असता सर्व चांदीची व सोन्याची रॅक अस्ताव्यस्त पडलेली दिसली त्यांनी तातडीने नीरा पोलीस चौकीस कळवले. निरा पोलीस चौकीची नाईट रूटची गाडी रोज रात्री दोन वाजता निरा शहरांमध्ये फिरत असते त्यावेळी काहीही दिसून आले नाही म्हणजेच पहाटे तीनच्या दरम्यान हा ऐवज चोरीला गेल्याची शक्यता आहे अधिक तपास नीरा पोलीस करत आहेत. नक्की किती ऐवज चोरीला गेला याबाबत जेजुरी पोलीस तपास करत आहेत.
COMMENTS