Baramati News l खाऊ आणायला जातो सांगून अंजनगावाचा श्रेयस हरवला : माळेगाव पोलिसांनी अवघ्या ९ तासात शोधून काढला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील अंजनगाव त बारामती जि पुणे या गावातील संतोष कदम यांचा मुलगा तिसरीत शिकत असलेला ९ वर्षांचा श्रेयस संतोष कदम हा  हरवला होता. माळेगाव पोलिसांनी अवघ्या नऊ तासात त्याचा पणदरे परिसरातून शोध घेत आई वाडीलांच्या स्वाधीन केला.  
         सविस्तर हकीकत, दि. २६  रोजी १२ वाजता श्रेयस हा आईस किराणा दुकानातून काहीतरी खायला घेऊन येतो असे सांगून निघून गेलेला होता, परंतु बराच वेळ झाल्यानंतर देखील तो घरी न परतल्यामुळे त्याची आई व बहीण तसेच इतर नातेवाईकांनी त्याचा  अंजनगाव या गावात तसेच परिसरात शोध घेऊन देखील तो न सापडला नाही म्हणून शालेय मुलगा श्रेयस याचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केलेबाबतची फिर्याद श्रेयस याची आई पुनम संतोष कदम रा.सदर यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात दिली. माळेगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे प्रभारी अधिकारी, माळेगाव पोलीस ठाणे यांनी सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांच्याकडे देऊन तात्काळ अपहृत मुलगा श्रेयस याचा शोध घेण्यासाठी चार वेगवेगळी तपास पथके तयार करून त्यांना श्रेयस याचा शोध घेण्यासाठी रवाना केले तसेच घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे सदर मुलाचा शोध पणदरे तालुका बारामती परिसरात घेण्यात माळेगाव पोलिसांना यश आलेले असून शालेय मुलगा श्रेयस यास त्याचे आई-वडील यांच्या ताब्यात सुखरूप परत देण्यात आलेले आहे. 
       सदरची कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक.सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर,.देविदास साळवे, तुषार भोर, पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, अमोल राऊत, नितीन कांबळे, गणेश खंडागळे, नंदकुमार गव्हाणे, धीरज कांबळे, महिला पोलीस अंमलदार सुनिता पाटील यांनी केलेली आहे
To Top