जावली l आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद द्या : ज्ञानदेव रांजणे यांची मागणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : धनंजय गोरे 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विक्रमी मताधिक्याने निवडून आले. यात जावळी तालुक्यातील कुसुंबी जिल्हा परिषद गटाचा मोठा वाटा असून या गटाने शिवेंद्रसिंहराजे यांना अकरा हजाराहून अधिक मताधिक्य दिले आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी परिश्रम घेतले. कुसुंबी गटात रांजणे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रत्येक गावात केलेल्या प्रभावी प्रचार यंत्रणेमुळे या गटातून शिवेंद्रसिंहराजे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले आहे.
              हा जिल्हा परिषद गट वेण्णा दक्षिण विभाग, केळघर विभाग, व बामणोली विभागातील काही गावे असा विभागला असून हा गट दुर्गम आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळी तालुक्यात वाड्या-वस्त्यांवर विकासकामे मार्गी लावली आहेत. गावोगावी असणारी कार्यकर्त्यांची मजबूत फळी,त्यांचा गावोगावी असणारा जनसंपर्क , सहजपणे उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे.श्री. रांजणे यांनी कुसुंबी गटातून सर्वांना सोबत घेऊन आमदार भोसले यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम केले. त्यामुळे या गटातून शिवेंद्रसिंहराजे यांनी मताधिक्य घेतले.
सलग चार वेळा आमदार शिवेंद्रसिंहराजे निवडून आले असून यावेळी राज्यात मोठ्या मताधिक्य मिळवून आमदार शिवेंद्रसिंहराजे विजयी झाल्याने भाजप -महायुतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना महत्वाचे खाते असणारे मंत्रिपद देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा यथोचित सन्मान करून सातारा-जावळी मतदारसंघाला लाल दिवा मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केली आहे
To Top