सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर विधानसभेचा विकास हा अभ्यास मनी धरून मागील तीन ते चार वर्षांपासून अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील हे भोर - वेल्हा (राजगड)-मुळशी तालुक्यात विकास कामे करीत आले आहेत.भोर विधानसभेतील जनता सुज्ञ आहे.भोर विधानसभेतील मतदारांनी सांगली पॅटर्न राबवून एकदा अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांना निवडून द्या.माय- माऊलींनो किरण दगडे पाटील आमदार म्हणून पुढील काळात कायम तुमच्या पाठीशी राहुन विकास साधतील असे प्रतिपादन भोर येथे अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी सिने अभिनेते प्रवीण तरडे गुरुवार दि.७ यांनी केले.
अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली त्या किल्ल्यावरील शंभू महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.यावेळी भोर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, युवा वाॅरीयर तालुका अध्यक्ष रोहन भोसले,भोर तालुका भाजपा उपाध्यक्ष समीर घोडेकर,भोर तालुका भाजपा माजी अध्यक्ष अशोक भागवत, बबन दगडे ,नवनाथ पारखी ,गोविंद रणपिसे,नवनाथ डाळ, उपाध्यक्ष आकाश दानवले,सुरज चव्हाण,मेघराज सोनवणे,सागर धुमाळ,तुषार बांदल, धनंजय कोंढाळकर, विजय तामकर, संकेत धनावडे, ज्ञानेश्वर बैलकर माऊली बदक, दत्ता पांगुळ, विलास मालुसरे, प्रवीण चौधरी, विशाल दुसंगे, चंद्रकांत तारु, विजय रेणुसे,मिनानाथ शिवतरे, प्रसाद शेटे, उमेश बारंगळे, बाळासाहेब आवाळे, संदीप बोडके, सुनील बांदल,विजय थोपटे आदिल्स हजारो नागरिक उपस्थित होते.