सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
निरा : विजय लकडे
पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर नीरा नदीच्या पुलावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत जुना पाडेगाव टोलनाका जवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील प्रकाश गुलाबराव सांगळे वय ६० रा. हडपसर पुणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्रकाश सांगळे हे आपल्या स्प्लेंडर क्र. MH.12 पिक्यु ०५९२ या दुचाकीवरून हडपसर होऊन फलटण कडे निघाले असता नीरा नदीच्या पुलावरती सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती साताराहून आलेल्या ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच कोसळला, अपघातानंतर ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. अपघातग्रस्त सांगळे यांना तातडीने ग्रामस्थांनी लोणंद येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.