Javali Breaking l धनंजय गोरे l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत अचानक बिघडली : तपासणीसाठी डॉक्टरांची टिम दरे गावात दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम -----
जावली : धनंजय गोरे 
महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सर्व बैठका रद्द करून त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील मूळ गावी दरे येथे काल दुपार पासून मुक्कामी असून आज अचानक त्यांची तब्बेत खालावली असून ताप कणकण जाणवू लागल्याने डॉक्टरांची टिम लगेचच उपचारा करीता त्यांच्या गावी घरी दाखल झाली आहे. 
             मिळालेल्या माहिती नुसार त्यांचा ताप 105 अंश सेलसियस पर्यंत गेला असून सतत च्या धावपळी मुळे तसेच व्यस्त कार्यक्रम यामुळे त्यांच्या तबियत वर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना सलाईन देखील लावल्याचे समजते आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आराम केला असून त्यांनी मीडिया तसेच ग्रामस्थ कार्यकर्ते यांची भेट घेणे टाळले.
         शिवसेना नेते व माजी मंत्री दिपक केसरकर देखील यांची देखील मुख्यमंत्री यांच्या सोबत भेट होऊ शकली नाही त्यामुळे ते दरे गावाहून थेट मुंबई ला गेले. 
To Top