पुरंदर l वीरपत्नी स्नेहल भोसले यांना यावर्षीचा दुर्गमहर्षी प्रमोद मांडे राष्ट्रप्रथम पुरस्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे  
महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय, निरा या ठिकाणी यावर्षीचा राष्ट्रप्रथम पुरस्कार कार्यक्रम पार पडला. वीरपत्नी श्रीमती स्नेहल अविनाश भोसले यांना यंदाचा दुर्गमहर्षी प्रमोद मांडे राष्ट्रप्रथम पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.           
हुतात्मा जवान अविनाश हरिश्चंद्र भोसले हे देश सेवेसाठी भारतीय सैन्यात कार्यरत होते, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी अंबाला कॅन्ट,हरियाणा येथे देश सेवेत कार्यरत असताना मेजर अविनाश हरिश्चंद्र भोसले यांना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांच्या या बलिदानास राष्ट्रप्रथम परिवारा तर्फे त्यांच्या वीर पत्नीस राष्ट्रप्रथम पुरस्कार देण्यात आला. सदर कार्यक्रमात युवा व्याख्याते अनिकेत यादव यांनीआझादी के दीवाने या विषयावर शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे, प्रमुख उपस्थिती म्हणून जेजुरी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक महेश पाटील हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत राहुल चव्हाण, आदित्य कोंडे,सागर सपकाळ यांनी केले.राष्ट्रप्रथम परिवाराकडून प्रसाद दांगट पाटील यांनी आभार मानले .
To Top