सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बोरकरवाडीत ८४.८० तर राजबाग येथे ८२.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. सुपे येथील चार मतदान केंद्रावरील ४ हजार ९०० मतदारांपैकी ३ हजार ३४६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ७०.७७ टक्के नोंद झाली. या परिसरात एकुण शांततेत मतदान झाले. मात्र मतदानाचा टक्का वाढल्याने त्याचा लाभ कोणत्या दादाला होणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
येथील परीसरातील मतदान केंद्रांवर सहापर्यंत बोरकरवाडी येथे ८४.८० टक्के, बाबुर्डीत दोन केंद्रावर ८१.५८ टक्के, शेरेचीवाडीत ७८.५९ टक्के, पानसरेवाडीत ७२.६७ टक्के,:कुदळेमळा येथे ८२.२९ टक्के, कुतवळवाडीत ६७.१० टक्के, वढाणेत ६९.२१ टक्के, कौलेवाडीत ६७.५३ टक्के, भोंडवेवाडीत ७३.२७ टक्के, काळखैरेवाडीत ६६ टक्के, राजबाग ८२.४५ टक्के, दंडवाडीत ७७.३५ टक्के, खोपवाडीत ८०.२८ टक्के, खंडुखैरेवाडीत ७६ टक्के, चांदगुडेवाडीत ७०.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. तर बोरकरवाडीत रुख्मीणी बाबुराव बोरकर या १०१ वर्षाच्या वृद्ध महिलेने मतदान केले. खंडुखैरेवाडीत १०५ वय असलेल्या पुतळाबाई राजपुरे आणि मथुराबाई खैरे या दोन वृद्ध महिलांनी मतदान केले.
तर भोंडवेवाडीत सायंकाळी सात पर्यंतही मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. भोंडवेवाडीत दोन वेगवेगळी मतदान केंद्र असावे. तरच गर्दी अटोक्यात येईल. अन्यथा एकच केंद्र केले असल्याने मतदान करण्यास उशीर होत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली.
................................................