बारामती विधानसभा l खंडोबाचीवाडी येथील ९५ वर्षीय लक्ष्मीबाई मदने यांनी बजावला मतदानाचा अधिकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
बारामती विधानसभा मतदारसंघात चुरशीची निवडणूक होत आहे. विधानसभेच्या इतिहासात प्रथमच पवार विरुद्ध पवार असा मोठा चुरशीचा सामना होत आहे. प्रत्येक गावातील वाड्यावस्त्यावरील बुथ प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपल्या बुथवर मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करताना दिसत आहेत. 
        बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील लक्ष्मीबाई दिनकर मदने वय ९५ रा. खंडोबाचीवाडी  या आजीबाईने आपला मतदानाचा हक्क आपला नातू विराज मदने याला सोबत घेऊन खंडोबाची वाडी येथील बुथवर काठीचा आधार घेत पायी जाऊन आजीबाईने मतदानाचा हक्क बजावला. बारामती विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावातील कार्यकर्ता आपल्या गावाची मतदानाची टक्केवारी वाढवताना दिसत आहे.
To Top