सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी हिरडोस मावळ खोऱ्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख हनुमंत प्रभाकर कंक यांनी आपल्या मुळगावी मौजे धारांबे पो.रायरी येथे परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.
भौगोलिक दृष्ट्या भोर तालुका डोंगर रांगांच्या परिसरात विखुरलेला आहे.बहुतांशी ग्रामीण भाग हा दुर्गम डोंगरी आहे.दुर्गम भागात सामाजिक काम करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुख पदापर्यंत पोहोचण्याचा मान धारांबे ता.भोर येथील सुपुत्र हनुमंत कंक यांनी मिळवला. कंक यांनी मतदान केंद्रावर सकाळी लवकरच पोहोचून कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.