भोर विधानसभा l संतोष म्हस्के l उमेदवारांमध्ये धाकधूूक तर मतदारांमध्ये निकालाची उत्सुकता : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर विधानसभेच्या निवडणुकीत चौरंगी लढत झाली असून मागील पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा पाच टक्क्यांनी मतदान वाढले आहे. शनिवार दि.२३ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 
            निकालाला काही तासच बाकी असल्याने उमेदवारांमध्ये धाकधुक सुरू झाली आहे तर मतदारांमध्ये उत्सुकता लागली असल्याचे चित्र आहे. भोर विधानसभेत लाडक्या बहिणींचे तसेच नवमतदारांनी झाडून मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढला गेला असल्याचे बोलले जात आहे.तसेच मतदारांना लक्ष्मीदर्शन केल्याने तालुक्यात २०१९ च्या तुलनेत यावेळी मतदान ५ टक्क्यांनी वाढली गेले आहे.सध्या दोन दिवसांपासून पारावांच्या गप्पा रंगल्या असून आमचाच आमदार होणार आहे लावतो का पैज, मोठ्या मतांनी माझ्याच पक्षाचा आमदार निवडून येणार आहे अशा चर्चांना उधान येऊ लागली आहे.तर भोर विधानसभेच्या चौरंगी लढतीत चारही उमेदवारांना मतदारांनी पसंती देत चुरशीचे मतदान केल्याने नक्की कोण आमदार होणाऱ्या याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.


                                            
To Top