सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भागात बारामती विधानसभेचे उमेदवार अजित पवार यांचे विजयाचे बॅनर झळकले आहेत.
बारामती विधानसभेला अतिशय चुरशीच्या झालेल्या पवार विरुद्ध पवार या लढतीमध्ये कोणाचा विजय होतो याची उत्सुकता लागलेली आहे. निकालाला अजून २४ तासाचा अवधी असताना देखील बारामतीच्या बागायती पट्ट्यातील निंबुत नजीक खंडोबाचीवाडी येथे अजित पवार यांची बारामती मतदारसंघातील आमदार कधी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
बागायती पट्ट्यातील कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार निवडून येणार असा आत्मविश्वास असल्यामुळे अशा आशयाचे बॅनर लागलेले दिसत आहेत.