बारामती विधानसभा l गुलाल उधळत..फटाके फोडत..सुपे परगण्यात अजित पवारांच्या विजयाचा जल्लोष

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
बारामती विधानसभा मतदार संघाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या लक्षवेधी लढतीत अजित पवार यांनी दहाव्या फेरी अखेर ५० हजाराचे लीड घेतल्याने सुपेकरांनी बाजार मैदानावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन  गुलालाची उधळण करीत फटाके फोडत जल्लोषात साजरा केला. 
        मागिल काही दिवसापासुन लक्ष लागुन राहिलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत घड्याळ चालणार की तुतारी असे संदिग्घ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आज सकाळ पासुन मतमोजणी कडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले होते. सुप्यातील चौका चौकात तरुणाईसह सर्वच जण निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष देवुन होते. सर्वांचे मोबाईल मध्ये येणाऱ्या निकालाकडे लक्ष होते. 
       पहिल्या टपाल पेटीचा अपवाद वगळता अजित पवार यांनी जे लीड घेतले. ते लीड युगेंद्र पवार यांना मागे टाकता आले नाही. त्यामुळे सुप्यात तरुणाईचा सकाळ पासुन गुलाल उधळत फटाके फोडत एकच जल्लोष केला. 
        ......................................
To Top