सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दौंड : प्रतिनिधी
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या अगदी लक्षवेधी ठरलेल्या दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी सुरुवातीपासून मिळवलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत विजयी हॅटट्रिक पुर्ण केली आहे.राहुल कुल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.विजयानंतर राहू परिसरात डीजेच्या गाण्यांवर युवक कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्तपणे उधळण करत जल्लोष केला आहे.
दौंड विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणी दौंड येथून सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पोस्टल मतमोजणीने सुरू करण्यात आली होती.यामध्ये राहुल कुल यांनी आघाडी घेतली ती संपूर्ण मतमोजणी फेरी अखेर कायम ठेवून रमेश थोरात यांच्यावर १३,९०६ एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.विजयानंतर कार्यकर्त्यांनी डीजे लावून जल्लोष साजरा केला आहे.
.................................................................................