Bhor News l भोर तालुक्यात हुडहुडी वाढली : सकाळ-संध्याकाळी पेटू लागल्या शेकोट्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात मागील चार दिवसांपासून थंडी वाढली असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली असून थंडीपासून बचावासाठी नागरिक घरातून बाहेर पडणे पसंत करीत नाहीत. तर बहुतांशी लोकांकडून सकाळी व सायंकाळी शेकोट्या पेटवून थंडी घालवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
      तालुक्यात सध्या २३ अंश सेल्सिअस टेंपरेचर असून थंडी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.थंडीचा उपयोग रब्बीतील पिकांना होणार असला तरी नागरिक गारठून गेले आहेत.थंडी वाढल्यामुळे नागरिक गारठून गेले असल्याने शेती कामावर याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे.वाढत्या थंडीमुळे नागरिक घराबाहेर पडले पसंत करत नसल्याचे चित्र आहे.तर चिमुकल्यासह वयोवृद्द थंडीपासून बचावासाठी वर्षभर घरात पडून असलेल्या स्वेटर,कानटोपी,मफलर या उबदार वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत.पुढील काळात अजूनही मोठ्या प्रमाणावर गारठा वाढला तर नागरिक त्रस्त होण्याचे चित्र आहे.चार दिवसांपासून दैनंदिन तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान वाढत्या थंडीत आजाराचे प्रमाण कमी होते असे म्हटले जात असले तरी सध्या तालुक्यात रुग्ण संख्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
----------------------
थंडी वाढली तर पिकांना फायदा
मागील चार दिवसांपासून थंडी वाढल्यामुळे नागरिक गारठले आहेत.मात्र या थंडीचा फायदा सध्याच्या रब्बीतील पिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पुढील काळात थंडी वाढली तर रब्बीचे पिके जोमात येतील असे नेरे येथील शेतकरी गोकुळ म्हस्के यांनी सांगितले.
                                           
Tags
To Top