सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
मोरगाव ता. बारामती येथील सुप्रसिद्ध कापड व्यापारी नारायण कृष्णाजी जाधव वय - ८४ वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
केली पन्नास वर्षे कापड व्यवसायातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. तालुक्याच्या ग्रामीण भागात ते सर्वात जुने व्यापारी म्हणून ओळखले जात होते. या परिसरातील विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. गेली एक महिन्यापासून आजारी होते. नुकतेच काही वेळापूर्वी मोरगाव येथे राहत्या घरी त्यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले मुली व नातवंडे असा परिवार आहे