सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु झाली आहे आणि अशातच सोने - चांदी चे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने ज्यांचेकडे लग्नकार्य आहे अशा कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे.
या वर्षी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या भावात उच्चान्क होऊन 2२४ कॅरेट सोन्याने ८० हजार रु. तर चांदीने १ लाखाचा टप्पा गाठला होता. १५ दिवसातच सोने चांदीच्या भावात घसरण होऊन काल २४ कॅरेट सोने ७४ हजारांवर आले तर चांदी ८९ हजार रुपयांवर आली असून खरेदी करणारांसाठी व गुंतवणूक करणारांसाठी हि सुवर्णसंधी आहे असे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना आळंदीकर म्हणाले कि काही महिन्यापूर्वी भारत सरकार ने सोने - चांदी वरील आयातशुल्क १५ टक्क्यावरून ६ टक्कयांवर आणले त्यावेळी हि एवढ्याच प्रमाणात दर कमी झाल्याने सोने चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला होता,तसाच प्रतिसाद पुन्हा सराफ व्यवसायिकांना मिळेल. सोने चांदीचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी, पुरवठा, भुराजकीय तणाव, महागाई, चलनातील चढउतार, अमेरिका फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर, जी डी पी, इत्यादी बाबींवर अवलंबून असतात.
रशिया - युक्रेन, इराण - इस्त्राईल युद्धाचा जागतिक बाजारपेठेवरील तणाव वाढल्या कारनाने सोने - चांदीच्या भावात वाढ झाली होती, परंतु नुकतीच अमेरिकेच्या नूतन राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी करून युद्धविराम देण्यासाठी आणि डॉलर मजबूत करण्यासाठी पाऊल उचलल्याने सोने चांदीचे भाव कमी झाले झाले.
असे असले तरी पुढील महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व बँक व्याजदरात आणखी कपात करण्याची शक्यता असल्याने सोने - चांदीचे भाव पून्हा वाढतील असे हि किरण आळंदीकर यांनी सांगितले.