Baramati News l सोमेश्वर कारखाना करणार १३ लाख टनाचे ऊस गाळप : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गाळप हंगामाचा प्रारंभ गुरुवार (दि. १४) रोजी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, शिवाजीराव राजेनिंबाळकर, संग्राम सोरटे, संभाजी होळकर, संचालिका प्रणिता खोमणे, कमल पवार, अधिकारी कालीदास निकम, दिपक निंबाळकर, योगीराज नांदखिले, डॉ. मनोहर कदम, बापूराव गायकवाड उपस्थित होते. 
                सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने येणाऱ्या हंगामात १३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंत्रणांचे करार पूर्ण होऊन ऊस तोडणी कामगार सोमेश्वर परिसरात दाखल झाले आहेत.  सोमेश्वरकडे सभासदांचा साडेअकरा लाख टन ऊस गाळपास आहे. तसेच गेटकेन धारकांचा दीड लाख मे. टन ऊस आणून कारखान्याचे १३ लाख गाळपाचे नियोजन असल्याची सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. पंधरा दिवस हंगाम उशिरा सुरू होत आहे. कारखाना एक नोव्हेंबर पासून सुरू झाला असता तर आत्तापर्यंत एक ते दीड लाख टनाचे गाळप पूर्ण झाले असते. ते आता उन्हाळ्यात होईल. २०एप्रिल पर्यंत हंगाम सुरू ठेवावा लागणार आहे. उशिरा हंगाम सुरू झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रात हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुरुवातीला कारखाना पाच ते सहा हजार मे.टन गाळप करेल त्यानंतर पूर्ण क्षमतेने गाळप करणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. 
          येणाऱ्या गाळप हंगामासाठी सोमेश्वरकडे ११५० बैलगाडी, ३८० ट्रक ट्रॅक्टर, २६० डंपिंग तसेच २० हार्वेस्टर या यंत्रणाचे करार पूर्ण झाले असून ऊस गाळपास यंत्रणा तयार आहे. सभासद, कामगार, ऊसतोड कामगार व अधिकारी यांच्या सहकाऱ्याने गाळप हंगाम यशस्वी पार पाडू, असा विश्वास अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला. 
................
सोमेश्वर कारखाना गाळप हंगामात सुरुवातीच्या ७० ते ७५ दिवसात सभासदांच्या आडसाली ऊसाच्या गाळपास प्राधान्य देणार आहे. हे गाळप झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने गेटकेन ऊसाचे गाळप केले जाईल.
.............
या सभासदांना मिळाला मान.
कल्याण नथाराम तुळसे, उत्तम म्हस्कु होळकर, 
चंद्रकात भिकुलाल फरांदे, नवनाथ शंकरराव जगताप, राहुल लक्ष्मण नाझीरकर,  तानाजी संपत वायाळ, 
 अॅड. बाळासाो गुलाब गायकवाड, नारायण भिकोबा भोसले, विठ्ठल संपतराव साळुंखे. 
..............
To Top