भोर विधानसभा l भोर विधानसभेतील प्रचारात कुलदीप कोंडेंची आघाडी : तरुणांसह, महिलांचा मोठा सहभाग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी
भोर,वेल्हा,मुळशीतील जनसामान्यांचा नेता म्हणून अनेक वर्षांपासून ओळख असणारे भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून प्रचारादरम्यान महिला व तरुणांचा मोठा सहभाग असल्याचे चित्र आहे.
     गेल्या दहा वर्षापासून कुलदीप कोंडे हे जनतेच्या मनातील आमदार असे सोशल मीडियावर व्हायरल होत होते.सद्यस्थितीला ही पोस्ट सत्यात उतरत असून दिवसेंदिवस कुलदीप कोंडे यांच्या प्रचारात वाढ झालेली दिसून येत आहे.त्यामुळे भोर विधानसभा मतदारसंघात कुलदीप कोंडे यांना अधिक पसंती मिळत आहे.भोरमध्ये एमआयडीसी येईल या आशेने  तरुण वर्ग कोंडे यांच्याकडे बघत असून विजयी झाल्यानंतर एमआयडीसीला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे कुलदीप कोंडे यांनी सांगितले.
To Top