सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नवी मुंबई : गणेश धनावडे
वाढती लोकसंख्या आणि वाढती गर्दी नवी मुंबईसाठी मोठी समस्या असली तरी अशा अनेक समस्यांना नवी मुंबईकर सामोरे जात असतात. मनसे नेहमी आपल्या शैलीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कोणतेही समस्या असो की नागरिकांच्या आरोग्याचा, सामाजिक , न्याय आणि हितासाठी नेहमी मनसे आपली ठाम भूमिका मांडली आहे.
अनेक सामजिक , शैक्षणिक, विकास साठी मनसेची भूमिका अग्रगण्य मानली जाते.तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापे उपविभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांनी घणसोली स्टेशन ठाणे - बेलापूर रोड तसेच ठाणे - पनवेल रोडवरती स्पीड ब्रेकर बसवण्याबाबत निवेदन देण्यात आले , सतत होणाऱ्या अपघात प्रमाण कमी करण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्पीड ब्रेकर बसवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले . तसेच मनसेकडून लवकरात लवकर बसवण्यात यावा अन्यथा तीव्र रस्ता बंद आंदोलन करून निषेध करण्यात येईल असे निवेदन रस्ते दुरुस्ती अभियंता विभाग यांना करण्यात आले आहे.