सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील पळसोशी,नेरे ता. भोर येथील ३ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने नागरिक गंभीर जखमी झाल्याचे घटना घडली असून यातील दोन नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गंभीर अवस्थेत जखमी झालेले पिसाळलेले कुत्रे पळसोशी आणि नेरे गावात सैरावैरा फिरत असून नागरिकांवर पिसाळलेले कुत्र्याने हल्ला केल्याने तीन नागरिक गंभीर जखमी झाले अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.या प्रकारामुळे नेरे, पळसोशी परिसरातील शेती काम करणारे नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर भयभीत झाली असून पिसाळलेल्या कुत्र्याच्या भीतीने घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी पळसोशी येथील तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश म्हस्के त्यांच्यासह संतप्त नागरिकांकडून होत आहे.