सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
गेली अनेक दिवस वरील चित्रामधील दिसणारा इसम वेगवेगळ्या दुकानात जाऊन खरेदी करतो. स्कॅनरचा फोटो काढतो. डॉक्टर मित्राला पाठवतो असे सांगतो. समोरचा डॉक्टर मित्र भाव व्यवस्थित लावलाय का याची खात्री करतो व पैसे पाठवतो असे त्या व्यावसायिकाला सांगतो. सदर ग्राहक पैसे भरल्याचा स्कॅनर दाखवतो, स्कॅनर वर पैसे पेड केल्याचा मेसेज दाखवतो व वस्तू घेवून गायब होतो.
सदर ईसमाने मागच्या महिन्यात केडगाव,चौफुला, पाटस परिसरातील सराफाना गांडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे लक्षात हा प्रकार आल्याने त्यांची फसवणूक टळली. त्याने काल बारामती येथे महालक्ष्मी ज्वेलर्स मधे जाऊन त्याने तीन ग्रामची अंगठी खरेदी केली. त्याचे बील २३ हजार ६४० रुपये झाले. अंगठी घेतल्यावर तो सारफाला बोलला माझ्या डॉक्टर शिंदे या मित्राला स्कॅनर पाठवतो. समोरील डॉक्टर मित्राने भाव व मजुरी बाबत सारफाकडे चौकशी करून पैसे पाठवतो असे म्हणाला व ज्वेलर्स चे मालक विनोद ओसवाल याना पैसे भरले असल्याचा मेसेज या ग्राहकाने दाखवला प्रत्यक्षात ती रक्कम खात्यावर आलीच नाही. सदर ईसम कुणाला आढळल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन बारामती सराफ असोसिएशनने केले आहे.