सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे सातारा महामार्गावरील वेळू (खेडशिवापूर) ता.भोर येथील कल्पना फायबर कंपनीला मंगळवार दि.१२ सायंकाळच्या वेळी अचानक लागलेल्या भीषण आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले. मात्र जीवितहानी टळली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
आगीने काही वेळातच रौद्ररूप घेतल्याने धुरांचा लोटच्या-लोट परिसरात पसरला होता.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.