Navi Mumbai l गणेश धनावडे l धक्कादायक... ! नऊ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नवी मुंबई : गणेश धनावडे
 नवी मुंबईतील बेलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बेलापुरात क्षुल्लक कारणावरून हाणामारीची भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्याने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेलापूरमधील पंचशीलनगर झोपडपट्टीत शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्याने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. ९ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकारानंतर आरोपीच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To Top