सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : धनंजय गोरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी अचानक आपल्या मूळ गावी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या ठिकाणी भेट दिली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भरघोस मताधिक्य मिळाले यामुळेच आपल्या मूळ गावी येत सर्वप्रथम त्यांनी श्री उत्तेश्वर देवस्थानला जाऊन श्री चे दर्शन घेतले. तसेच त्यांनी दरे ग्रामस्थांची भेट घेऊन पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी ग्रामस्थांनी देवाकडे जी प्रार्थना केली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देत आभार मानले.
नवी दिल्ली येथे भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी यांची भेट घेऊन ते लगेचच गावी आले आहेत,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुचने नुसार देवेंद्र फडणीस अजित पवार व एकनाथ शिंदे यांची एकत्रित बैठक होणार असून त्या आधी त्यांनी गावी येऊन देवाचे दर्शन घेत ग्रामस्थांशी संवाद साधला, ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले,अडीच वर्षाच्या काळामध्ये मला मुख्यमंत्रीपद मिळाले हाच गौरव आहे .महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काय निर्णय घेतला जाईल. तो मला मान्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दौऱ्यामुळे दरे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.