सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : धनंजय गोरे
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत व सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना त्यांच्या प्रतिभेला साजेशे मंत्रीपद देऊन त्यांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने
कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिरात अभिषेक व महाआरती करून देवाला प्रार्थना करण्यात आली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समाजकारण व राजकारणातील योगदान मोलाचे आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले एक चारित्र्यसंपन्न, निस्पृह व निष्कलंक असे प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आहे. त्यांची लोकप्रियता समाजाभिमुख काम करण्याची पद्धत यामुळे त्यांच्याकडे राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची धमक आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात योग्य ते सन्मानाचे स्थान मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाल्यास सातारा जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे असे मत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी श्री पिंपळेश्वर वाकडेश्वरमंदिरात जावली शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र शिंदे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अंकुशराव शिवणकर, कुडाळ विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन काशिनाथ शेवते, प्रतापगड कारखाना संचालक नाना पवार, विश्वासराव बोराटे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी कुडाळ व परिसरातील महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कर्तुत्व संपन्न नेतृत्व विराजमान व्हावे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिमंडळात सन्मानाचे स्थान मिळावे अशी देवाला प्रार्थना केली.