Ladki Bahin yojana l लाडकी बहीणचे निकष बदलणार : एकाच कुटुंबातील 'या' महिलांना मिळणार लाभ !

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुंबई : प्रतिनिधी
स ध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या राज्यात भाजप-महायुतीच्या अभूतपूर्व विजयात 'लाडकी बहीण' योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याने महायुतीचे नवे सरकार ही योजना पुढे चालू ठेवणार आहे.
      मात्र त्यातील एक-दोन निकष बदलले जाण्याची शक्यता आहे. या योजनेतून दरमहा २,१०० रुपये देण्याची ग्वाही महायुतीने प्रचारादरम्यान केली होती. मात्र, तूर्तास १,५०० रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो. शिवाय, कुटुंबात जास्त महिला असतील तर यातील फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा विचार सुरू झाला आहे. या योजनेतून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील २ कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली.

परिणामी, महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले. महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल, असा प्रचार महाविकास आघाडीकडून करण्यात आला. मात्र, 'लाडकी बहीण' योजना सुरू राहणार असली तरी या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत बदल केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 'लाडकी बहीण' शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत बदल केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 'लाडकी बहीण' योजना महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी घोषित केली. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक साहाय्य देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकर दाता नसावा, असे सध्याचे या योजनेचे निकष आहेत.
To Top