Weather Update l पुणे, नाशिक व नगरला थंडीची लाट वाढणार : यलो अलर्ट जाहीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा कमालीचा खाली आला आहे. या ठिकाणी किमान तपमानाचा पारा आठ अंशांपर्यंत खाली आला आहे.

त्यामुळे या भागात हुडहुडी वाढली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहे. तापमानाची ही स्थिती दोन दिवस कायम राहत नाशिक, नगर, पुण्यात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार, या भागात थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

देशातील उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीची लाट तीव्र आहे. या वाढत्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होत आहे. उत्तरेकडील हे थंड वारे राज्यात येत असल्याने महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची घट होतान दिसत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर भागात थंडीचा जोर वाढला आहे. दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या' भागात थंडीचा यलो अलर्ट

थंडीच्या या लाटेचा उत्तर महाराष्ट्रावर मोठा परिणाम झाला आहे. या ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने राज्यात थंडीची चाहूल उशीरा लागली. असे असले तरी उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच थंडीचा रोज दिसून आला. सध्या थंडीचा जोर अजून वाढला असून या ठिकाणी या मोसमातील अतापर्यंतचे निचांकी तापमान नोंदविण्यात आले आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालय, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे नीचांकी किमान 8.3 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, पुणे आणि अहिल्यानगर येथे किमान तापमान 9 अंशांपेक्षा कमी नोंदविण्यात आले. त्यानुसार, आज म्हणजेच 28 आणि उद्या म्हणजेच 29 रोजी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे येथे थंडीच्या लाटेची शक्यता असून या ठिकाणी थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
To Top