सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम( ता. बारामती) येथून पवित्र उमराह यात्रेसाठी दि. २४ नोव्हेंबर रोजी जवळपास वीस यात्रेकरू मुंबईहून पवित्र उमराह यात्रेसाठी सौदी अरेबिया येथील इस्लाम धर्मीयांमध्ये अतिशय पवित्र मानली जाणारी शहरे मक्का आणि मदिना येथे जाण्यासाठी अतिशय भक्तिभावाने आणि उत्साहाने रवाना झाली.
ही यात्रा पंधरा दिवसांची असून अनेक धार्मिक प्रार्थना आणि धार्मिक सोपस्कार यामध्ये पार पाडली जातात. कुटुंबीयांनी आणि अनेक समाज बांधवांनी त्यांना या कामी शुभेच्छा दिल्या. अमिना इनामदार, तरन्नुम पठाण , निलोफर इनामदार ,मुमताज इनामदार , शेरखान इनामदार , रहमतुल्ला इनामदार ,शहनाज इनामदार, करिष्मा इनामदार , उमर शेख , आबिदा शेख , यास्मिन इनामदार, रहिमतबी इनामदार व इतर असे सर्व यात्रेकरू मुरूम या ठिकाणाहून उमराह करण्यासाठी रवाना झाले. पंधरा दिवसानंतर उमराह झाल्यानंतर दिनांक नऊ डिसेंबर रोजी ते भारतात परत येणार आहेत. सौदी अरेबिया येथे मक्का मदिना या ठिकाणी उमराह यात्रेसाठी जगभरातून मुस्लिम बांधव येत असतात.