सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
हॅपी थॉट्स नावाने ओळखली जाणारी तेजस ज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवा संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रोप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे या विशेष प्रसंगी फाउंडेशन तर्फे १ डिसेंबर रविवार निरा येथील (ग्रामपंचायत हॉल) येथे रयत जयंती ज्ञान महोत्सव (सिल्वर जुबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन निरेचे सरपंच तेजश्री काकडे, पुणे जिल्हा परिषद माजी सभापती दत्ताजी चव्हाण, निरा उपसरपंच राजेश काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात येत आहे. तेज ज्ञान फाउंडेशन चे संस्थापक तेजगुरु सरश्री यांनी जीवनात ध्यान व अध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद व शांती निर्माण केली आहे, तेजस ज्ञान फाउंडेशन तर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देतो, या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशन सर्व साधक, ध्यान प्रेमी आणि नागरिकांना उत्साह पूर्वक आमंत्रित करण्यात आले आहे. निरा व परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.