सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बादल सुरक्षित आहेत.
मात्र, सुदैवाने सुखबीर बादल सुरक्षित आहेत. हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून पोलिसांनी आरोपीकडून पिस्तूल हस्तगत केली आहे.
सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर सिंग बादल पहरेदारांच्या भूमिकेत सेवा देत असताना ही घटना घडली. अचानक नारायण सिंग नावाच्या एका व्यक्तीने पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील सतर्क नागरिकांनी तत्काळ त्याला अडवले, ज्यामुळे गोळी चुकली आणि बादल सुरक्षित राहिले.