Baramati News l निंबुत येथे चोरट्यांचा ट्रान्सफार्मरवर डल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे  
बारामती तालुक्यातील निंबुत नजीक लक्ष्मीनगर जवळील बेट भागातील डीपी ट्रान्सफॉर्मरवर डल्ला मारून चोरी केली आहे. 
       निरा नदी जवळील गट नंबर चार येथील बसवलेल्या ट्रान्सफरवर काल दि. ३ रोजी चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली आहे, यामुळे येथील शेतकरी हवालदील झालेला आहे. काही महिन्यापूर्वी देखील येथील शेतकऱ्यांच्या केबल वायर, तीन एचपी व पाच एचपी च्या मोटर देखील चोरीस गेलेले आहेत, त्याचा तपास अद्याप चालू असताना चोरट्यांनी थेट ट्रान्सफर वर डल्ला मारल्याने शेतकरी उभ्या असणाऱ्या पिकाला कसे पाणी देणार याच्या चिंतेत आहे, सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम चालू झाल्यामुळे नंबर आलेल्या शेतकऱ्यांचा ऊस भिजवण्याकडे कल आहे परंतु ट्रांसफार्मर चोरीला गेल्यामुळे येथील शेतकरी ऊस व गहू पिकाला कसे पाणी देणार या विवंचनेत आहे. डी पी चोरीबाबत येथील शेतकऱ्यांच्या बरोबर माहिती घेतली असता या चोरीमध्ये येथील जवळचे काही लोक सामील असण्याची शक्यता देखील शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
To Top