सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी नजीक विकासनगर येथे घराचे दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना पाय घसरून पडल्याने एका गवंडी काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तोशिबी दस्तगिर सय्यद वय ३३ रा. विकासनगर-वाणेवाडी ता. बारामती या गवंडी कामगाराचा मृत्यू झाला आहे. याबाबत अल्लाउद्दीन कादर पठाण रा. विकासनगर- वाणेवाडी ता. बारामती यांनी वडगाव निंबाळकर पोलीसात फिर्याद दिली आहे. सविस्तर हकीकत दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता मयत तोसिफ दस्तगीर सय्यद हा सतिश सदाशिव भोसले यांचे घराचे दुसऱ्या मजल्यावर गवंडी काम करत असताना त्याचा पाय घसरुन तोल गेल्यामुळे जमीनीवर पडला. यामध्ये त्याच्या तोंडाला, डोक्याला व पायाला मार लागल्यामुळे मृत्यू झाला आहे.