सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चालणाऱ्या कोपी वरच्या शाळेतील मुलांना आज ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
संचालक ऋषी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा रुपी शैक्षणिक साहित्याच्या मदतीचे आव्हान मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या आव्हानाला सोमेश्वर परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळी २० डझन वह्या, 250 पेन,पेन्सिल, पुस्तके इ. साहित्य जमा झाले होते. साखर हंगाम सुरु झाल्यावर कारखान्यावर पालकांसोबत येणाऱ्या मुलांना शिकवण्याचे काम कोपी वरची शाळा करते. बहुतांश मुले पालकांसोबत येताना कोणतेही शालेय साहित्य सोबत आणत नाहीत. या शालेय साहित्य वाटपामुळे त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यास मदत होईल अशी भावना या वेळी पालकांनी व्यक्त केली.
या वेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड,निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष हरिष गायकवाड,वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड,करंजेपुलचे उपसरपंच प्रवीण गायकवाड, करंजेपुलचे तंटामुक्ती उपाध्यक्ष शिवाजी शेंडकर, ग्रामपंचायत सदस्य सुहास गायकवाड,मा. तंटामुक्ती अध्यक्ष सागर गायकवाड, मा.उपसरपंच निलेश गायकवाड,युवा नेते सचिन शेंडकर,राहुल गायकवाड,सुरज जाधव,धीरज गायकवाड,गणेश शिंदे ई मान्यवर उपस्थित होते. या मदती बद्दल कोपी वरच्या शाळेचे प्रमुख संतोष शेंडकर व शिक्षकांनी आभार व्यक्त केले.