Markadwadi Ballot Paper l विजय पवार l मारकडवाडी ग्रामस्थांचा निर्णय देशाला आरसा दाखवणारा : मा. न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळशिरस : विजय पवार
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी मारकडवाडी ता. माळशिरस गावास आपल्या न्यायालयातील विधी तज्ञांसह भेट दिली.        

यावेळी बोलताना कोळसे पाटील म्हणाले, माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये गावातील मतदानामध्ये झालेला फरक व गोंधळ पाहता मारकडवाडी ग्रामस्थांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राला व देशाला आरसा दाखवणारा ठरणार आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, "तव्याचा जाय बुरसा त्याचा सहज होयी आरसा"या उक्तीप्रमाणे, ईव्हीएम च्या माध्यमातून संविधान व लोकशाही वर जो अंधार झालेला आहे तो दूर करण्याची दिशा मारकडवाडी गावाने महाराष्ट्राला व देशाला दिलेली आहे. कुठला राजकीय पुढारी म्हणून मी आपल्या गावाला भेट दिलेली नाही, माझी लढाई ही कायम ईव्हीएम च्या विरोधातील आहे. या देशातील लोकशाही व संविधान आपल्याला वाचवायचे असेल तर बॅलेट पेपर वर निवडणुका होणे ही काळाची गरज आहे, तरच या देशाची लोकशाही टिकेल, असे आपले विचार त्यांनी व्यक्त करून गावकऱ्यांचे मनापासून आभार मानले.
To Top