सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
मुळीकवाडी ता. फलटण येथील
वनविभागात दारू पिण्यास व शेकोटी करण्यास मनाई करणाऱ्या वनरक्षकास लाथाबुक्क्याने मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात लोणंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुरज राजेंद्र इनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणंद पोलिसांनी
विशाल दिलीप जाधव रा. मुळीकवाडी ता. फलटण अनिकेत उर्फ नामदेव मारुती आडके व सुजित दत्तात्रय जाधव दोन्ही रा. धुळदेव ता. फलटण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुळीकवाडी ता. फलटण गावचे हद्दीत शासकीय वनक्षेत्र हद्दीत वनरक्षक हे त्यांचे मोटरसायकलवरून पेट्रोलिंग करीत असताना त्यांना विशाल दिलीप जाधव रा. मुळीकवाडी ता. फलटण, अनिकेत उर्फ नामदेव मारुती आडके, सुजित दत्तात्रय जाधव दोन्ही राहणार धुळदेव ता. फलटण हे दारू पीत असताना व शेकोटी करून शेकत असताना मिळून आल्याने वनरक्षक इनकर यांनी त्यांना शासकीय वनक्षेत्रात शेकोटी करू नका असे म्हणाले असता त्यांनी इनकर यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना वनरक्षक इनकर पळून जाऊ लागल्याने त्यांच्या कानावर जोरात दगड फेकून मारून कान तोडून गंभीर दुखापत केली आहे व शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देऊन इनकर करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे.