Baramati Breaking l बारामतीत धारदार शस्त्राने एकाची हत्या : तिघांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामतीत एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. बारामती शहरातल्या प्रगती नगर परिसरात गुरुवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. 
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत हा आरोपीच्या मावस बहिणीशी बोलत असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेत सदाशिव गजाकस असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे याच्या मावस बहिणी बरोबर मयत अनिकेत टीसी कॉलेज परिसरात बोलत होता. याबाबत माहिती कळतच आरोपी नंदकिशोर, महेश नंदकुमार खंडाळे आणि संग्राम खंडाळे (पूर्ण नाव माहित नाही) हे तिघे त्या ठिकाणी आले. यावेळी तिघांनी थेट कोयत्याने अनिकेत याच्या गळ्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या केली..घटनेची माहिती मिळतात बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट दिली.  याप्रकरणी पोलिसांनी तिघांनी विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले.
To Top