सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
पुणे शहरानजीक खडकी येथील होळकर पुलाशेजारी होळकर घराण्याच्या वीर पुरुषांच्या समाध्या अनेक वर्ष दुर्लक्षित होत्या.
सदर ठिकाणी आजही जुने तटबंदी बुरुज अस्तित्वात आहेत. याबाबत इतिहास अभ्यासक समीर निकम, श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, व होळकर घराण्यावर, इतिहासावर प्रेम करणारे अनेक समाज बांधव अनेक वर्षांन पासून समाधीच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न व पाठपुरावा करत होते. या सर्व प्रयत्नांची दखल घेत अखेर राज्य शासनाने होळकर छत्री ही राज्य संरक्षित स्मारक म्हणून दि.16/12/24 रोजी घोषित केली. सदर होळकर छत्री संरक्षणार्थ पुणे शहरातील इतिहास अभ्यासक समीर निकम यांनी अनेक वर्ष विविध प्रकारे लढा दिला.
वेळप्रसंगी वाद विवादालाही सामोरे जावे लागले. समीर निकम यांनी प्रशासनाला वारंवार सदर होळकर छत्री बाबत पाठपुरावा करत येथील होणाऱ्या बदलांबाबत सूचना व तक्रारी दिल्या. या जागेवर मागील काळात जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तीने अफूची शेती केल्याचेही समीर निकम व घनश्याम बापू हाके यांनी निदर्शनास आणून दिले होते. ऑक्टोबर 2024 मध्ये याच ठिकाणी होळकर घराण्याचे वंशज भूषण राजे होळकर व इतिहास अभ्यासक समीर निकम त्याचबरोबर अनेक समाज बांधव यांनी लाक्षणिक उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात प्रत्यक्ष समाधी स्थळी दि .21/12/24 रोजी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तरी या ऐतिहासिक स्मारकाबद्दल अधिक व संपूर्ण माहिती इतिहास अभ्यासक समीर निकम यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे पत्र राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंहराजे होळकर व इतिहास अभ्यासक समीर निकम यांनी काढले आहे. यावेळेस मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित जमणार आहेत. महाराष्ट्रातील विविध भागातून समाज बांधव शनिवारी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी एकत्र येणार आहेत. शनिवारी मोठ्या प्रमाणात धनगर बांधव एकत्र येणार आहेत.
"होळकर छत्री" होळकर पुलाशेजारी, खडकी,पुणे. 21/12/24 शनिवार सकाळी ठीक 11 वाजता. उपस्थित राहावे असे आवाहन श्री भूषणसिंह राजे होळकर यांनी केले आहे.