आम्ही लग्नाळू... l संतोष म्हस्के l लग्नाळूच्या लग्नाचा बार यंदा तरी उडणार का ? पित्यांकडून वधूची शोधाशोध, तरुणांपुढे यक्षप्रश्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 भोर तालुक्यात प्रत्येक गावात सरासरी ३० ते ४० पस्तिशी उलटून गेलेले वर पाहिला मिळत असून वधू मिळत नसल्याने तरुण चांगलेच त्रस्त झाल्याचे चित्र आहे. दरम्यान तालुक्यातील हजारो लग्नाळुंच्या लग्नाचा बार यंदा तरी उडणार का असा प्रश्न वराच्या पित्यांना भेडसावत आहे.
         हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहानंतर लग्नसराइला सुरवात होते.गेल्या काही वर्षांत जन्मदर घटल्याने लग्नासाठी मुली मिळणे अवघड होत आहे.यामुळे बहुतांशी वारांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र दिसून येते.यंदा तरी मुलाचा विवाह उरकून टाकण्यासाठी 'लग्नाळू'च्या पित्याची शोधाशोध सुरू झाली आहे. मात्र मुलीच मिळत नसल्याने ग्रामीण भागातील युवकांची परिस्थिती गंभीर होऊन बसली आहे.यंदा तरी आपल्या लग्नाचा बार उडेल का? अशी अपेक्षा बाळगून असलेल्या लग्नाळूचा दरवर्षीच हिरमोड होतो.यामुळे लग्न होईल का? असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे पडत आहे.कार्तिकी पौर्णिमेला तुळशी विवाह आटोपताच लग्नसोहळे सुरू झाले आहेत. उपवर मुला-मुलींसह स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला आत्ता वेग आला आहे. परंतु अलीकडे मुलींच्या अपेक्षा वाढल्या असल्याने तसेच प्रेमविवाहाचे गौडबंगाल मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बहुतांशी तरुणांची लग्न होत नसल्याचे चित्र आहे.सध्या मुलींच्या घरची परिस्थिती नाजूक असली तरी मुलींना आई-वडिलांकडून उच्चशिक्षित केले जात असल्याने आपली मुलगी चांगल्या घरात जावी, तिच्या मालकाकडे शहरात फ्लॅट असावा,एक वाहन असावे तसेच मुलगा शासकीय नोकरीत असावा अशा मुलींच्या आईच्या अपेक्षांमुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे.समाजात गावोगावी उत्कृष्ट नोकरी तसेच शेती असतानाही अनेक मुलांना मुली पसंत करीत नाहीत.मात्र बहुतांशी मुली आई-वडिलांच्या विचाराधीन होऊन घरच्या गरीब परिस्थितीची जाणीव न ठेवता साध्या कंपनीमध्ये काम करणारे तसेच ओव्हरॲक्टिंग करून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढनाऱ्या मुलांशी पळून जाऊन लग्न करीत असल्याचे चित्र आहे.परिणामी मुली आपल्या स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आयुष्य उध्वस्त करीत असल्याचे बोलले जात आहे.
---------------------
मुली मुलांच्या बरोबरीत 
 तालुक्यात म्हटले जात आहे की मुलीची संख्या कमी आहे.त्यामुळे तरुणांना मुली मिळत नाही.मात्र याच्याउलट मुली मुलांच्या बरोबरीने आहेत हे सत्य असताना मुलींचे पालक आपल्या मुलीच्या लग्नासाठी यंदा कर्तव्य नाही असे म्हणून धजावत नसल्याचे समोर येत आहे असे वराच्या पालकाकडून सांगण्यात आले.
-----------------
वधूसाठी दोन्हीकडील खर्चाची तयारी
उपवर कुटुंबीय नातेवाईकांकडे जाऊन 'यंदा कर्तव्य आहे... एखादी मुलगी पहा ' असा सूर आळवत आहेत.त्यातच आता वराकडील मंडळी दोन्ही बाजूंचा खर्च करण्याची तयारी दर्शवत आहेत.
तरीही वधू कडील पिता मुलीचे लग्न करण्यास नाकारत आहेत असे वराच्या पित्यांकडून सांगण्यात येत आहे.
                                           
To Top