सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
नीरा-मोरगाव राज्यमार्गावर यवतमाळ होऊन सातारला निघालेल्या स्विफ्ट डिझायर गाडी क्र. MH 30. AZ 0782 या चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने शेजारील विद्युत खांबावर जोरात आदळून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या पिकात पलटी झाली. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
यवतमाळहुन सातारला आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेली स्विफ्ट गाडी नीरा ता. पुरंदर नजीक दगडे वस्ती येथे पाटील त्यांच्या सुमारास गाडीचा टायर फुटल्याने स्टेरिंग वरचा ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्युत खांबावर जोरात आढळली गाडीचे पुढचे बोनेट पूर्ण चक्काचूर झाले असून सुदैवाने गाडीतील बसलेले तिघेही थोडक्यात बचावले. ड्रायव्हर. पवन सुभाष भोपे वय 27 रा. पुसद ता. पुसद जि. यवतमाळ गाडीमध्ये मागे बसलेले गजानन दिगंबर बुरखाडे वय 39 रा. कंनखा
ता. मेहकर, अनिल टागे 35 रा. कंनखा. ता. मेहकर यांना जबर मुका मार लागला असून त्यांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे, नुकतेच निरा मोरगाव राज्य मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात अपघाता वेळी पहाटेचे तीन वाजले असल्यामुळे नागरिक गाढ झोपेत होते परंतु जोराचा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना तातडीने गाडी बाहेर काढून जवळच्याच खाजगी दवाखान्यात दाखल केले, नेहमी वाहनांची वर्दळ असलेल्या निरा बारामती व निरा मोरगाव चौकामध्ये स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून येथील स्थानिक नागरिक करत आहेत.