सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
कोपर्डे ता. खंडाळा गावातील एका मंदिरात चाललेला बालविवाह लोणंद पोलिसांनी हाणून पाडून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
इंदूमती साधू पडळकर रा. सुखेड ता. खंडाळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणंद पोलिसांनी सारिका हणमंत वाघमारे, हणमंत बापुराव वाघमारे, अमृता प्रल्हाद जाधव सर्व रा.कोपर्डे ता.खंडाळा, शशिकांत रामचंद्र कुरंबळीकर रा.लोणंद ता.खंडाळा जि.सातारा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १ रोजी कोपर्डे ता.खंडाळा गावचे हद्दीतून ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये बालक ऋतिक हणमंत वाघमारे वय २० व मुलगी अमृता प्रल्हाद जाधव वय १९ वर्षे दोघे रा.कोपर्डे ता.खंडाळा यांचा बालविवाह मुलाची आई सारिका हणमंत वाघमारे वडील हणमंत बापुराव वाघमारे जि.सातारा लग्न विधी करणारे पुरोहित शशिकांत चंद्रकांत कुरंबलीकर रा.लोणंद ता.खंडाळा तसेच मुलगी अमृता हिस बालक ऋतिक हा वय वर्ष २१ वर्षापेक्षा कमी असल्याचे माहिती असताना देखील त्याच्याबरोबर विवाह करण्यास तिने संमती दिली.