सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठव्यांदा भरघोस मताने बारामतीच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल कोऱ्हाळे खुर्द येथील सर्व मतदारांच्या घरोघरी लाडूचे वाटप करुन आभार व्यक्त करण्यात आले.
मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुका आमदारपदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल व महारष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी म्हणून कोऱ्हाळे खुर्द येथील प्रणिता मनोज खोमणे संचालिका व मा. व्हॉइस चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, कोऱ्हाळे खुर्दचे मा. सरपंच गोरख खोमणे, शरद खुडे युवा उद्योजक मा. उपसरपंच कोऱ्हाळे खुर्द यांनी कोऱ्हाळे खुर्द येथील सर्व मतदार बंधू भगिनींना लाडू वाटप करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रणिता मनोज खोमणे यांनी सांगितले की आजपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत होतो आजही आहोत आणि इथून पुढेही आपल्या सर्वांना सोबत घेऊन असेच राहणार आहोत. यावेळी बोलताना सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, तुम्ही जे लाख मोलाचे मत देऊन अजितदादांना भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल आपले आभार आणि माझ्या लाडक्या बहिणीनीचे तर लाख लाख आभार.यावेळी गोरख खोमणे म्हणाले भैरवनाथ आणि सोमेश्वर चरणी एकच प्रार्थना आहे. दादांना मुख्यमंत्रीपद मिळावे.
या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेले मान्यवर .पुरुषोत्तम जगताप चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना , लालासो माळशिकारे मा.व्हॉइस चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, डॉ मनोज खोमणे,.विजुभाऊ सोरटे,.प्रमोद पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, IT सेल ,.कोंढाळकर, कोऱ्हाळे खुर्द बूथ कमिटी अध्यक्ष युवराज पवार, कुलदीप पवार, सदस्य सोमनाथ पारसे, प्रफुल्ल खोमणे, योगीराज खोमणे, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाडू वाटप करण्यात आले व संध्याकाळी घरोघरी लाडू वाटप होणार असल्याचेही प्रणिता मनोज खोमणे यांनी सांगितले. यावेळी भैरवनाथ तरुण मंडळ कोऱ्हाळे खुर्द सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.