सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भोर नगरपरिषद भोर यांच्यावतीने नगरपरिषद सभागृहात शहरातील अपंगांना विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी भोर शहरातील अपंगांचा निधी लवकरच वाटप केला जाईल अशी ग्वाही दिली.तर नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी श्रीमती संगीता बोराटे यांनी विविध शासकीय योजना विषयी माहिती देऊन अपंग व्यक्तींनी शासकीय सवलतींचा सवलतींचा फायदा घ्यावा असे सांगितले. यावेळी जगदीश लोखंडे,अनिल गिरे ,रमेश गुरव, आण्णा गोळे,खलील दफेदार,अशोक मोरे आदींसह अपंग व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.