सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील महात्मा गांधी तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी तुषार तानाजी शिंदे तर उपाध्यक्षपदी गोपाळ तानाजी चव्हाण यांची निवड करण्यात आली.
आज दि. ६ रोजी वाणेवाडी ग्रामपंचायतच्या अस्मिता भवन याठिकाणी ही निवड पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गीतांजली जगताप होत्या. यावेळी माजी सरपंच दिग्विजय जगताप, राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष adv. नवनाथ भोसले, शिवसेना तालुकाध्यक्ष स्वप्नील जगताप, उपसरपंच सागर चव्हाण, दुशांत चव्हाण, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष इंद्रजित भोसले, कल्याण जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षपदासाठी तुषार शिंदे, गोपाळ चव्हाण, एन डी सावंत व किशोर शेळके यांनी मागणी केली होती. यामधून ग्रामस्थांमध्ये चर्चा होऊन पाहिले अडीच वर्षे तुषार शिंदे यांना त्यानंतरची अडीच वर्षे एन डी सावंत यांनी अधक्षपद देण्यात आले तर गोपाळ चव्हाण यांना पाच वर्षासाठी उपाध्यक्षपद देण्यात आले.