Baramati News l प्राथमिक आरोग्य केंद्र व पाणी पुरवठा योजनेसाठी 'सोमेश्वर'कडून बक्षीसपत्र जागा….२५ कोटींच्या कामाची लवकरच उभारणी !

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 वाघळवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जल जिवन मिशन योजनेअंतर्गत वाघळवाडी ग्रामपंचायतीस मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची उभारणी करण्यासाठी जागेची आवश्यकता होती.     
       जागेच्या प्रतिक्षेत असलेल्या दोन्ही योजनांचा मार्ग आता सुखर झाला आहे. त्याच्या उभारणी करिता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने वाघळवाडी ग्रामपंचायतीस विनामोबदला बक्षीसपत्राद्वारे जागा दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघळवाडी ग्रामपंचायतीस पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी २० कोटी ६० लक्ष आणि आरोग्य केंद्रासाठी ४ कोटी ५० लक्ष इतक्या निधीच्या योजना मंजुर केल्या आहेत.
       उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यरत असून सोमेश्वर कारखान्याकडील जागा पाणी पुरवठा योजनेसाठी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्याबाबत कारखाना प्रशासनास सुचित करण्यात आले होते. 
     कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 
वार्षिक सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठा योजनेतील पाणी साठवण तलावा करिता ३ एकर २० गुंठे जागा तर पाणी साठवण टाकीसाठी दीड गुंठे जागा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी ५० गुंठे जागा वाघळवाडी ग्रामपंचायतीस देण्याबाबत संचालक मंडळाने वार्षिक सभेस शिफारस केली होती.त्यास मंजुरी देत वार्षिक सभेने बहूमताने जागा देणेबाबतचा ठराव मंजूर केला होता. या झालेल्या निर्णयानुसार कारखान्याने वाघळवाडी ग्रामपंचायतीस वरील विकासकामांच्या करिता विनामोबदला बक्षीसपत्राद्वारे जागा दिली आहे.
     प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारणीसाठी जागेची प्रतिक्षा होती.ती संपल्याने सोमेश्वर परिसरातील वाघळवाडी,वाणेवाडी,निंबुत,मुरूम,करंजेपुल,खंडोबाचीवाडी,गडदरवाडी,सोरटेवाडी,करंजे,चौधरवाडी,मगरवाडी,देऊळवाडी आदी गावातील नागरिकांना तसेच परिसरातील शिक्षण संस्था,सोमेश्वर’चे  ऊसतोड कामगार यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण होताच आरोग्य सुविधा मिळू शकणार आहेत.
   तसेच पाणी पुरवठा योजनेमुळे वाघळवाडीतील आणि सोमेश्वर कारखाना परिसर येथील नागरिकांना जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे शुद्ध पाणी मिळणार असल्याने त्याचा फायदा येथील नागरिकांना आणि ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या शिक्षण संस्था,ऊसतोड कामगार यांना फ़िल्टरयुक्त पाणी पिण्यास उपलब्ध होणार आहे.
   आरोग्य केंद्र आणि पाणीपुरवठा योजना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मा.आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे,पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर यांनी सहकार्य केले तर जागेच्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, सोमेश्वरचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे,ग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार भोसले यांनी पूर्ण केली.
      आरोग्य केंद्र आणि पाणी पुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीस बक्षीसपत्र जागा दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार,सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालक मंडळाचे,सर्व सभासदांचे ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अँड. हेमंत गायकवाड,उपसरपंच गणेश जाधव,सतिश सकुंडे,अजिंक्य सावंत,जितेंद्र सकुंडे,अनिल शिंदे,तुषार सकुंडे,प्रभाकर कांबळे,विशाल हंगिरे यांनी आभार व्यक्त केले.
-----------–-–--------     
अजितदादांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला,पाणी पुरवठा योजना मंजुरी दिली.त्याला निधी आणि कारखान्याकडून जागा पण मिळवून दिली.१०० बेडच्या हॉस्पिटला निधी देऊन मंजुरी दिली.वनउद्यानाची मागणी होती ती पूर्ण केली.अजितदादांच्या मुळे वाघळवाडी-सोमेश्वरनगर गावच्या विकासाचा आलेख उंचावत आहे.त्यासाठी ग्रामस्थ पाठिंबा देत आहेत.हे फक्त अजितदादांच पूर्ण करू शकतात.
सरपंच, अँड. हेमंत गायकवाड
To Top