सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पंढरपूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. इथे भरधाव वेगानं येणाऱ्या बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की बस आणि ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर काहीजण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचासाठी नेण्यात आलं आहे.
आज सकाळी गुरसाळे गावाजवळ हा अपघात झाला. राजनंदनी ट्रॅव्हल्सची बस काही प्रवाशांना घेऊन जात होती, दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकला बसची धडक बसली. दोन्ही वाहनं वेगात असल्याने दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. यात बसच्या केबिनचा तर चक्काचूर झाला आहे. या अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले.