सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच सागर संपत चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना पदावरून हटवण्याबाबत वाणेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य सतिश गोरख जगताप यांनी बारामतीचे तहसीलदार यांचेकडे दहा सदस्यांचा सह्यांचे निवेदन दिले आहे. दरम्यान तहसीलदारांनी या अर्जाची दखल घेत दि. १ जानेवारी रोजी सदस्य मंडळाची तातडीची बैठक घेतली आहे.
याबाबत जगताप यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सागर चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव आणावा तसेच वाणेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर संपत चव्हाण हे ग्रामपंचायत कामात अडथळा आणत आहेत, ग्रामपंचायत सभेमध्ये अडथळा आणतात, सदस्य सभेमध्ये बोलुन देत नाहीत, ग्रामपंचायत कामकाजात सहभाग होत नाहीत, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी व्यवस्थित वागणुक देत नाहीत, ठेकेदार यांना दमदाटी करणे व पैशाची मागणी करणे, सर्व सदस्यांना विश्वासात घेवुन काम करत नाहीत अशा तक्रारी निवेदनात करण्यात आल्या
१) सतीश गोरख जगताप
२) रविराज तानाजी जगताप
३) अजितकुमार रामचंद्र भोसले ४) रमेश विष्णु घाडगे
५) वनिता नानासो कोकरे
६) मंगल हरिभाऊ मुळीक
७) उजमा असिफ सिकीलकर
८) मयुरी सचिन पवार
९) सोनाली संतोष निकम
१०) शारदा भिमराव जाधव या दहा ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनावर सह्या केलेल्या आहेत. या निवेदनाची तहसीलदार यांनी तातडीने दखल घेत १ जानेवारीला सदस्य मंडळाच्या मिटिंगचे आयोजन केले आहे.